Computer Basic

संगणकाची माहिती (Computer Information) 

 संगणक म्हणजे काय ? 

              संगणकाला इंग्लिश मध्ये कॉम्प्युटर (Computer) असे म्हणतात. 'Computer' हा शब्द 'compute' ( कोम्प्युट) या इंग्लिश क्रियापदा पासून बनला आहे. COMPUTER म्हणजे आकडे मोड़ किवा गणना करणे.५० वर्षा पूर्वी जेव्हा कॉम्प्युटर या शब्द प्रचलित झाला तेव्हा संगणक या यंत्राचा वापर मुख्यत आकडे मोड़ करण्यासाठीच केला जात असे, परन्तु दिवसोंन दिवस या यंत्रात अनेक सुधारणा होत गेल्या व अलीकड़े संगणकाचा वापर तर अनेक प्रकारे होवू लागला आहे. उदा . माहिती पाठवणे , तिचे वर्गीकरण करणे इतकेच नाही तर ध्वनी निर्मिती , चित्रीकरण अन्य असख्य कामासाठी संगणकाचा वापर होवू लागला आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर संगणक हे माहिती स्वीकारणारे , दिलेल्या सूचना नुसार माहिती प्रक्रिया करून अचूक उत्तर देणारे वेगवान इलेक्ट्रोनिक्स यंत्र आहे .


                 संगणकाचा इतिहास आपल्या प्राथमिक शिक्षणात अंक मोजणी आपण शकलो आहोत त्याच्यासाठी आजही मणि लावलेल्या पाटयाचा उपयोग करतात . प्राचीन काळी चीन मध्ये अंक मोजणी साठी बँबिलोनियन संस्कृतीत " अबँकस " (ABACUS) या यंत्राचा उपयोग केला जात होता .१८७१ साली चार्ल्स बँबेज याच्या गणन यंत्रात अमुल्याग्र बदला घडून आले या यंत्राला सुचानाचा संच पुरविता यायचा स्मरण शक्ति व उत्तरांची छपाई करण्याची सोय ही या यंत्राची वैशिष्टे होती या यंत्राचे नाव अनोलिटिल इंजिन असे होते . १८८० साली डॉ. हर्मन होलेरिथ या अमेरिकन शास्त्रद्याने पंचड़कार्ड प्रणालीचा शोध लावला .या प्रनालित कोणते ही काम वेगात पार पड़ता येवू लागले . त्यानीच पुढे आईबीएम कंपनी ( इंटरनेशनल बिज़नेस मशीन ) सुरु केली . १९४७ साली अमेरिकेतील हावर्ड विद्यापीठ व आईबीएम या कंपनी ने सयुक्त जगातील पहिला इलेक्ट्रानिक्स संगणक तयार केला .त्याचे नाव इलेक्ट्रानिक्स नुम्रिकल ईंटेग्रेटर एंड कैलकुलेटर असे होते . १९४७ साली भोतिक्शास्त्रत क्रांति होवून ट्रान्झीस्टर शोध लागला. १९५९ साला पासून कॉम्प्युटर मध्ये ट्रान्झीस्टर सर्किटचा वापर होवू लागला आहे . तेच आजचे संगणक आहे .संगणक फ़क्त १ किवा 0हेच अंक समजू शकतो .

म्हणुन खालील प्रमाने कंप्यूटरचा डाटा मोजला जातो. 
  • Bit -Single Binary Digit (1 or 0) Byte 8 bits 
  • Kilobyte (KB) 1,024 Bytes or » 8192 bits Megabyte (MB) 1,024 
  • Kilobytes Gigabyte (GB) 1,024 Megabytes Terabyte (TB) 1,024 
  • Gigabytes Petabyte (PB) 1,024 
  • Terabytes Exabyte (EB) 1,024 
  • Petabytes or » 1048576 TB 1073741824 GB 



संगणकाचे फायदे आणि उपयोग 

संगणक हे आज विविध क्षेत्रा मध्ये विविध प्रकारच्या व्यक्ति समुहाद्व्यारे आणि विविध कार्यासाठी वापरले जाणारे यंत्र आहे . एकविसाव्या शतकात संगणकाने मानवाच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत . संगणकाच्या सर्व प्रकारच्या उपयोगात येणार्या गोष्टींची नोंद करणे अशक्य आहे . आपण अगदी महत्वाच्या उपयोगावर दृष्टिषेप टाकुया . 

१) वेग :- कोणते ही काम असले तरी ते वेगाने पार पडावे अशी प्रत्येकाची अपेक्षा असते . संगणक कोणते ही काम सेकंदांच्या भागात करू शकतो अत्यन्त वेगाने करू शकतो आणि बिनचुक करू शकतो हा त्याचा सर्वात मोठा फायदा आहे . 

२) अथकपणा :- आपणकिती ही कार्यक्षम असलो तरीही तेच ते काम करण्यास कंटाळा येवू शकतो . संगणक हे एक यंत्र असल्याने त्याला एकाच प्रकारचे काम करण्यास कंटाळा येत नाही . 

३) स्वयंचलित :- संगणकाला कोणते ही काम करण्यासाठी योग्य फोड़ करुण दिल्यास योग्य सूचना आणि काम कोणाच्याही मदती शिवाय किवा देख्ररेखी शिवाय पार पडतो . 

४) तार्किक व अमृत प्रक्रिया :- गणिती प्रक्रिया बरोबर संगणक तार्किक व अमृत प्रक्रिया करू शकतो . कोणत्याही शास्त्रातील अमृत संकल्पना सोडवण्यासाठी संगणकाचा फायदा होतो . थोडक्यात एवढेच संगणकाची माहिती हाताळण्याचि तसेच सग्रहाची , वितार्न्याची क्षमता अफाट आहे . म्हणुन आजच्या माहिती तंत्र ज्ञानाच्या युगात संगणक काळाची गरज बनला आहे . आज प्रत्येक क्षेत्रात संगणकाचा उपयोग केला जातो . 

1) गणिती सूत्र किती ही अवघड असले तरी योग्य सूचना दिल्यास संगणक ते चटकन सोडवतो त्याच त्याच प्रकारच्या गणन करण्यात संगणक तरबेज आहे . 

२) संगणकामध्ये अती प्रचंड प्रमाणात माहिती संग्रहित करुण ठेवता येते , या संग्रहित करुण ठेवलेल्या माहिती मधून एखादी माहिती आपल्याला पाहिजे असेल तर लगेच सगणक आपल्या समोर ठेवतो . 

३) संगणकाचा उपयोग करुण आलेख , आकृत्या , आलेख तसेच रंगीत चित्र सुलभ पणे काढता येतात . 

४) कोणत्या ही क्लिष्ट सहाय्याने काढून ते वेगवेगळ्या कोनातून कसे दिसेल हे संगणकाच्या मदतीने पाहु शकतो.

5) उद्योग धंदे , व्यापार , बैंक , कॉल सेंटर , शेअर मार्केट, हॉस्पिटल , शाळा महाविद्यालय , टिकिट रिसर्वेशन अन्य खुप क्षेत्रात उपयोग होतो . 

६) भौतिक , गुंतागुंतीच्या शास्त्रात , सैन्यदलाच्या तिन्ही दलात बरीचशी भिस्त आता संगणकावर आहे . 

७) रोगाचे निदान लावण्यासाठि प्रतेक्ष शास्त्र्क्रियेत अचूकता येण्यासाठी संगणकाची मदत घेतली जाते .

८) इंजिनियरला घराचे , इमारतीचे तसेच पुलाचे डिझाईन करायचे असेल तर संगणकाच्या मदतीने तो पुर्व्        नकाशा बनवु शकतो . 

९) जन्म कुंडली बघणे तसेच अन्य कामासाठी संगणकाचा उपयोग केला जातो . 


 प्रकार आणि काम करण्याची पद्धत : 

संगणकाचे प्रकार :- 

           संगणकाचा शोध लागल्या पासून आज पर्यंत त्याच्या आकारात बरेच बदल होत गेले .पूर्वी संगणक आकाराने खुप मोठा होता आता त्याचा आकर खुपच लहान झाला आहे. उदा . डेस्कटॉप, लैपटॉप संगणकाचे तिन प्रकार आहेत. 

१) अनालोग कॉम्प्युटर

२) डिजीटल कॉम्प्युटर 

३) हाइब्रिड कॉम्प्युटर 


मेनफ्रेम संगणक :- 

संगणकाला एखादे काम करण्यासाठी ३ प्रक्रियेतून जावे लागते. 

१) इनपुट डिवाइस (Input Divice) 

2) सी . पी . यु . सेंट्रल प्रोसेसिंग यूनिट (Central Processing Unit) 

3) आउट पुट डिवाइस (Output Divice) 


डिवाइस (Input Divice) :- 

संगणकाला माहिती आज्ञा देणार्या विभागाला इनपुट विभाग म्हणतात . संगणका कडून योग्य व अचूक उत्तर मीळण्यासाठी त्याला योग्य माहिती दें जरुरी असत . ज्या द्वारे त्याला माहिती दिली जाते त्यात की- बोर्ड , माउस , स्कैनर , वेब कैमरा , या भागांचा समावेश असतो . सी .पी . यु . सेंट्रल प्रोसेसिंग यूनिट (Central Processing Unit) :- संगणकाच्या रचने मधील सर्वात महत्वाचा भाग याला विभागाला संगणकाचा मेंदू ही म्हणतात . सी. पी. यु. सम्पूर्ण लहान इलेक्ट्रानिक्स भागानी बनलेला आहे . सध्या वापरण्यात येणार्या पी -४ मधे ४२ कोटि ट्रांजिस्टर बसवलेले आहेत . सी . पी . यु . ला ही दोन भाग असतात . 

अ) अर्थिमटिक लॉजिक यूनिट 

ब) कंट्रोल 

अ) अर्थिमटिक लॉजिक यूनिट :- 

          हा विभाग संगणकाच्या महत्वाचा घटक आहे .याच्या नावा वरुनच कळते की या विभागात गणिती आणि तर्क याच्या विषयावरील माहिती तपासली जाते , त्यावर प्रक्रिया होते . बेरीज , वजाबाकी , गुणाकार, भागाकार, अशा सर्व गणिती क्रिया या विभागात केल्या जातात . तसेच एखाद्या संख्येची तुलना देखील दोन संख्ये मधून काढले जातात . 

ब) कंट्रोल यूनिट :- 

         संगणकामध्ये होणार्या सर्व क्रियेवर लक्ष ठेवण्याचे काम कंट्रोल विभाग करते. ज्या प्रमाणे मानवी शरीरात मेंदू माणसावर कंट्रोल ठेवते त्याच प्रमाने कंट्रोल यूनिट संगणकाच्या सर्व हालचालीवर लक्ष ठेवते . इनपुट विभाग कोणते ही काम करण्यासाठी सेंट्रल प्रोसेसिंग यूनिट कड़े पाठवतो म्हणुन याला संगणकाचे प्रोसेसिंग यूनिट (Processing Unit) असे म्हणतात . 

आउट पुट विभाग :- 

इनपुट विभागाने दिलेली माहिती सेंट्रल प्रोसेसिंग यूनिट कडून प्रक्रिया होवून आउटपुट विभागाकडे पाठवली जाते . म्हणुन याला कॉम्प्युटरचे आउट पुट विभाग असे म्हणतात . 
उदा :- मॉनिटर , प्रिंटर हार्डवेयर, सॉफ्टवेर म्हणजे काय? हार्डवेयर (Hardware) म्हणजे ईलेक्टोनिक्स भागानी जोडून केलेले संगणक होय . उदा . मॉनिटर , की-बोर्ड , हार्ड डिस्क , मदर बोर्ड , कैबिनेट , माउस , सी डी रोम , आदि . 

          सॉफ्टवेर (Software) म्हणजे संपूर्ण संगणकाचे चलन वळण ज्या प्रकारच्या सॉफ्टवेर कडून नियंत्रित होत असते ते सॉफ्टवेर . ऑपरेटिंग सिस्टम्स (OS) हे संपूर्ण संगणक कार्यरत करणारा एक प्रोग्राम आहे . संगणकाचे हार्डवेयर व सॉफ्टवेर शिवाय कुठलाच संगणक सुरु होत नाही . संगणक आणि त्यावर काम करणार्या व्यक्ति मधील सुस्वाद सॉफ्टवेर मुळेंच होतो . 



की-बोर्ड (Keyboard) : 

        की-बोर्ड (Keyboard):- की-बोर्ड हे संगणकाचे इनपुट डिवाइस आहे . की-बोर्ड च्या सहाय्याने आपणास संगणकाशी सव्वाद साधणे शक्य होते. संगणकाला माहिती देण्यासाठी किवा विशिष्ठ सूचना देण्यासाठी की-बोर्ड चा वापर होतो . की-बोर्ड सामान्यत टाइप रायटर सारखा असतो . जशी की आपण की-बोर्ड वर टाइप करतो तशीच अक्षरे स्क्रीन वर येतात . की-बोर्ड मध्ये काही बटन विशिष्ठ चिन्ह काढण्यासाठी असतात . की बोर्ड चे साधारण खालील चार भाग पडतात . 





१) फक्शनल की पेड़ 
२) अल्फा न्युमरिकल की पेड़ 
३) न्युमरिकल की पेड़ 
४) कर्सर की पेड़ 




 १) फक्शनल की पेड़ :- या मध्ये F1 ते F2 अशा फक्शनल कीज असतात . ह्या सर्व विशिष्ट कामा साठीच वापरतात . 

२) अल्फा न्युमरिकल की पेड़ :- या मध्ये A ते Z ही इंग्लिश मुळक्षरे असतात . एकूण २६ आणि ० ते ९ असे अंक असतात . 

३) न्युमरिकल की पेड़ :- यात ० ते ९ असे अंक असतात आणि काही विशिष्ठ कीज काही विशिष्ठ कामा साठीच वापरतात . 

४) कर्सर की पेड़ :- 

            लेफ्ट, राइट, डाउन , अप ह्या जागेवर जायचे असल्यास ह्या कीज चा उपयोग केला जातो . की बोर्ड वर कमीत कमी ८३ तर १२७ बटन असतात . सर्व साधारण की बोर्ड वर ११० कीज असतात . ज्या की बोर्ड वर ११० कीज पेक्षा जास्त कीज असतात त्याला मल्टीमीडिया की-बोर्ड म्हणतात . 
            की-बोर्ड CPU च्या मागील भागाला जोडले असते . की-बोर्ड नोर्मल, पीस / २ , युसबी तसेच वायरलेस पोअर्ट मध्ये उपलब्ध आहेत . विन्डोज़ XP मध्ये स्टार्ट मेनू वर क्लिक करून Run या आप्शन वर OSK टाइप करून ENTER बटन दाबल्या नतर एका विंडोवर एक कीबोर्ड येइल यावर माउस ने क्लिक केल्यास तेच के टाइप होतील ज्यावर आपण क्लिक करू .असा कीबोर्ड ज्या वेळेस आपला कीबोर्ड चालत नसेल काही कही कीज काम करत नसतील तेव्हा ऑन स्क्रीन कीबोर्ड कामाला येतो. 


माउस (Mouse) :- 
                  की-बोर्ड सारखे माउस आवश्यक इतके नसले तरी विन्डोज़च्या जगात अतीशय उपयोगात पडणारे माउस हे इनपुट उपकरण आहे . माउस द्वारे अक्षरे किवा अंक टाइप करता येत नाहीत . माउस हे दर्शक उपकरण आहे . माउस जसा आपण हलवतो तसा माउसचा पाँटर हालातो . साधारण माउस ला ३ बटन असतात . आता सध्याच्या माउस मधे २ बटन असतात आणि स्क्रोल्लिंगसाठी व्हिल २ बटणाच्या मध्ये असते . 
             माउस CPU च्या मागील भागाला जोडले असते . माउस सीरियल , युसबी तसेच वायरलेस पोअर्ट मध्ये उपलब्ध आहेत . माउसच्या मध्यमा मुळे ग्राफिक्स , डिजाईन , चित्र , आकृत्या काढने सहज शक्य होते . मिक्रोसॉफ्ट पैंट मध्ये माउस च्या सहाय्याने चित्र काढली जातात . 

माउसचे ३ प्रकार आहेत. 

मेंकेनिकल माउस :- 

           माउसचा हा सुरवातीचा प्रकार म्हणजेच ह्याच्या खालच्या भागाला एक लहानशी गोटी च्या आकाराचा बॉल असतो जो माउस सोबत फिरत असतो त्याची वायर CPU ला जोडली असत. ओप्टिकल माउस :- ह्या माउस ला खालच्या भागाला गोटी नसते . माउस च्या बाहेर पडणारा प्रकाश माउसच्या हालचालीवर नियंत्रण ठेवतो . कॉर्डलेस माउस :- अशा प्रकारचा माउस हा बटरी वर चालतो . CPU सोबत वायरलेस द्वारे चालतो . आशा माउस ला वायरलेस माउस देखिल म्हणतात . माउस साधारण खालील प्रकारच्या क्रिया करतो . 



१) क्लिक :- माउस चे डावे बटन एकदा प्रेस करून लगेच सोडून देणे या क्रियेला क्लिक असे म्हणतात . एखादी गोष्ट क्लिक करून आपण निवडू शकतो . 

२) डबल क्लिक :- डावे बटन लागोपाठ दोनदा प्रेस करून सोडणे म्हणजे डबल क्लिक होय . एखादा प्रोग्रम्म , फाइल ओपन उघडण्यासाठी माउस मध्ये डबल क्लिक चा उपयोग करतात . 

३) राईट क्लिक :- माउस चे उजवे बटन एकदा प्रेस करून लगेच सोडून देणे या क्रियेला राईट क्लिक असे म्हणतात . एखादी गोष्ठी संदर्भातील सुचानांची यादी आपण पाहू शकतो स्क्रीन वर . 



मेमरी (Memory): 

           CPU म्हणजे प्रोसेसर नतर मेमरी हा संगणकाचा महत्वाचा भाग आहे. मेमरी म्हणजे स्मरणशक्ति होय. ही मेमरी CPU मध्ये मदर बोर्ड वर स्लोट मध्ये लावली जाते . या कंप्यूटरच्या मेमरिचे २ भागात वर्गीकरण केले जाते .

१) रीड ओनली मेमरी (Read Only Memory) 

२) रंण्डम एक्सेस मेमरी (Random Access Memory) 

 १) रंण्डम एक्सेस मेमोरी (Random Access Memory) :- 
RAM साधारण डाटा स्टोर करण्यासाठी उपयोगी येते . Ram ही Volatile आहे या मुळे पीसी बंद केला की डाटा नष्ट होवून जातो . RAM चे ही २ प्रकार आहेत .

१) Static Ram 
२) Dynamic Ram Static Ram ला एकादी माहिती भेटली की ती पीसी जोपर्यंत बंद होत नाहीं तो पर्यंत तशीच राहते . याला ३० किवा ७२ पिंस असतात . Dynamic Ram ला डाटा Maintain करण्यासाठी Constant रेफ्रेशिंग लागते आणि हे अतिशय जलदगतीने होते . याला १६८ पिन्स असतात आणि ही RAM Statics Ram पेक्षा स्वस्त मिलते . 


 २) रीड ओनली मेमोरी (Read Only Memory) :- 

नावामध्ये सांगीतल्या प्रमाणे ही मेमरी फ़क्त वाचण्यासाठी होतो.यात माहिती पुसता किवा बदलता येत नाही. कॉम्प्युटर सुरु केला की बूट स्टार्ट अप मध्ये ही मेमरी वाचली जाते. पीसी बंद असला तरी ही माहिती डाटा पुसला किवा नष्ट होत नाही . डीडीआर रंम (DDR RAM) :- आलिकड़च्या काळात ह्या DDR RAM खुप नावाजल्या आहेत . याच कारण अस की ह्या मेमरिचा स्पीड बाकीच्या मेमरी पेक्षा डबल असतो आणि त्या कमी ही त्याच स्पीड ने करतात . SD Ram पेक्षा ह्या प्रकारच्या RAM दुप्पट डाटा ट्रान्सफर करतात शिवाय ह्या स्वस्त ही आहेत बाकीच्या मेमरी पेक्षा ह्यांचा स्पीड DDR 266Mhz च्या पेक्षा जास्त आहे. 

 मॉनिटर : 


 की -बोर्डच्या मदतीने संगणकाला दिलेली माहिती ज्या दूरदर्शन संचासारख्या दिसणारया पडद्या वर उमटते त्याला "मॉनिटर" असे म्हणतात . मॉनिटर म्हणजे व्हिजुअल डीस्प्ले यूनिट असे म्हणतात किवा व्ही .डी .यु . असे ही म्हणतात . मॉनिटर संगणकाचे आउट पुट डिव्हाईस असे म्हणतात . मॉनिटरला संगणकाचे आउट पुट डीव्हाईस असे म्हणतात .

 मॉनिटरचा आकार :  
मॉनिटरचा आकाराचे मोजमाप त्याच्या पडद्याच्या म्हणजेच स्क्रीनच्या कर्नाच्या लांबी मध्ये केले जाते . सामान्यत बाजारात १५" , १७" , १९", २१" अश्या स्वरुपाचे मॉनिटर उपलब्ध आहेत . फ्लाट्स स्क्रीन चे मॉनिटर हल्ली जास्त प्रमाणात विकले जातात . जेवढा आकार मोठा तेवढी त्याची किंमत जास्त असते .

 प्रिंटर :


 मोँनिटरच्या स्क्रीन वर जी माहिती मिळते त्यास आउटपुट असे म्हणतात .हा आउटपुट संगणक बंद केला की दिसेनासा होतो . स्क्रीन वर , हार्ड डिस्क , फ्लोपी डिस्क वर मिळणाऱ्या माहिती मध्ये पाहिजे तेव्हा बदल करता येतो म्हणुन अशा माहितीला सॉफ्ट कॉपी असे म्हणतात . संगणका मधून अशी माहिती प्रिंटर या प्रदान म्हणजेच आउटपुट डिवाइस मधून कागदावर छापता येते . प्रिंटर ने छापलेली माहिती तशीच राहते म्हणुन त्या माहितीला हार्ड कॉपी असे म्हणतात. प्रिंटर हे परेलाल किवा यूएसबी केबल द्वारे CPU मध्ये मदर बोर्ड ला जोडले जाते . प्रिंटर चे सध्या ३ भाग प्रचलित आहेत .

 1) डॉट मेट्रिक्स प्रिंटर :-


 ह्या प्रिंटर मधील अक्षरे अनेक टिम्बाच्या स्वरूपात छापली जातात. गोल बारीक़ पिन्सची एक किवा दोन लाइनची मालीका असते . प्रतेक पिन स्वतन्त्र पणे शाईच्या रिबिन्वर आघात करते . त्या मुळे रिबिन्वारिल शाईचा ठपका कागदावर उमटतो . संगणकाच्या संदेशा प्रमाने पिन्स रिबिन वर जलद गतीने आघात करतात त्या मुळे कागदावर टीबाच्या स्वरूपात अक्षरे उमटतात . डॉट मेट्रिक्स प्रिंटर हे कमी खर्चाचे असतात . पण प्रिंटिंगच्या वेळी खुप मोठा आवाज करत प्रिंटिंग करतात . बँकेच्या ठिकाणी अशाच प्रकारचे प्रिंटर वापरले जातात

 २) इंक जेट प्रिंटर :-


                              हे प्रिंटर शाईच्या तुषार जल्द गतीने फवार्य सारखे उडतात .इंकच्या तुषार सूक्ष्म छिद्रांच्या नॉझल्सने कागदावर उडवले जातात .यात नोझल्सच्या मदतीने योग्य प्रमाणात चार प्राथमिक रंग मिसळुन रंगित प्रिंट करता येते .

 ३) लेझर प्रिंटर :-


                                      हे प्रिंटर छापाईसाठी लेझर किरणांचा वापर करतात. संगणका कडून येणार्या माहिती नुसार हे लेझर किरण सतत गोल फिरणारया ड्रमवर पडली जाते . या लेझर किरण मुळे ड्रमवर स्थिर विद्युत प्रभाराचे ठिपके तयार होतात . ड्रमच्या लगत असलेली कोरडी शाईची भुकटी (टोनर) ड्रम वरील विद्युत् प्रभारित कागदावर मचकुराच्या ओळी किवा चित्राचे भाग तयार होतात . सध्या ओल इन वन (All In One ) प्रिंटरला जास्त मागणी आहे कारण हयात सर्व प्रकारचे Function आहेत .

 नेटवर्क चे ३ प्रकार पडतात .

 १) लोकल एरिया नेटवर्क (LAN) :- 

एकाच इमारती मधील किवा विभागातील संगणक एकमेकाना जोडले जातात त्याला लोकल एरिया नेटवर्क असे म्हणतात . या नेटवर्क मध्ये संगणक एकमेकाशी एकाच प्रकारच्या केबलने जोडलेले असतात . नेटवर्क मध्ये संगणकाची जोड़णी कमी असते . नेट वर्क च्या बाकीचा प्रकारा पेक्षा हे नेटवर्क स्वस्त असते LAN मध्ये LAN कार्ड आणि केबल आवशक असते. LAN १० किलो मीटर च्या कमी अंतरा साठी वापरले जाते .

 २) मेट्रोपोलिटन एरिया नेटवर्क (MAN) :- 

हे नेटवर्क LAN पेक्षा मोठे असते . मेट्रोपोलिटन एरिया नेटवर्क पूर्ण सिटी शहरात जोडले जाते . या नेटवर्क मध्ये वेगवेगळ्या केबलचा वापर केला जातो. एखाद्या मोबाइल कंपनीचे एखाद्या सिटी मधील वेगवेगळ्या भागात ह्या मुळे शक्य होते. टेलेफोन किवा रेडियो चे नेटवर्क म्हणजे MAN नेटवर्क होय .

 3)वाइड एरिया नेटवर्क (WAN) :-

 जेव्हा दोन शहरातील नेटवर्क एकमेकाना जोडले जाते त्या नेटवर्कला वाइड एरिया नेटवर्क असे म्हणतात . या नेटवर्क मध्ये टेलेफोन लाइनचा किवा उपग्रहाच्या मार्फ़त सेटलाईट द्वारे जोडले जातात .

 मोडेम :


 मोडेम म्हणजे संगणका मधली महितींची देवाण-घेवाण डिजीटल सिग्नल मधून करायची असते तेव्हा मोडेम ची गरज भासते . डिजीटल सिग्नल टेलेफोनच्या अनोलोग सिग्नल मधून जावू शकत नाही . म्हणजेच टेलेफ़ोनच्या लाइन मधून सन्देश एका संगणका मधून दुसर्या संगणका मध्ये पाठवायाचा असतो . तेव्हा मोडेम चा वापर करतात . संगणका मधून येणारा सिग्नल हा डिजीटल असतो तो मोडेमच्या सहाय्याने अनोलोग केला जातो. डिजीटल सिग्नल चे रूपांतर एनोलोग सिग्नल मध्ये केला जातो त्या रूपांतर करणारया क्रियेला मोडूलेशन असे म्हणतात . याच्या उलट एनोलोग सिग्नलचे रूपांतर डिजीटल सिग्नल मध्ये केला जातो तय रूपांतर करणारया क्रियेला डीमोडूलेशन असे म्हणतात. ही क्रिया मोडेम हे करते . मोडेमचे दोन प्रकार पडतात . 

 १) बाह्य मोडेम (External) :- 
जेव्हा मोडेम संगणकाला बाहेरून जोडले जाते . तेव्हा त्याला बाह्य मोडेम असे म्हणतात . एका बाजूने मोडेम संगणकाला जोडला असतो दुसर्या बाजूने मोडेम टेलेफोन लाइनला जोडला असतो 

2) अंतगर्त मोडेम (Internal) :- 
जेव्हा मोडेम संगणकाच्या CPU मध्ये मदर बोर्डला जोडले जाते . तेव्हा त्याला अंतगर्त मोडेम असे म्हणतात . फ़क्त मोडेमला टेलेफोने लाइन जोडली असते . मोडेम चा उपयोग प्रामुख्याने इंटरनेट करता केला जातो. मोडेम मधून डाटा मोजन्यासाठी एकक बीट्स पर सेकंड (bps) या परिमाण घेतले जाते. हल्लिचे मोडेम ५६ kbps स्पीड चे आहेत . लैपटॉप मध्ये इन्टरनेटसाठी मोबाइल कंपनीचे डाटा कार्ड उपलब्ध झाले आहेत . टाटा , रिलायंस , तशेच अन्य डाटा कार्ड उपलब्ध जाले आहेत .

 वेब कैमरा  :


 वेब कैमरा आपण सिनेमात पाहील असले ही हीरो हिरोइन बरोबर चाटिंग करत आहे आणि ती हिरोइन त्याला चाटिंग करताना एक विंडो मध्ये मोनिटर च्या स्क्रीन वर हिरोइन लाइव चित्र रुपात दिसत आहे. ह्याला कारण की ती वेब कैमरा समोर बसली आहे . त्यामुळे वेब कैमरा समोर जे चित्र येइल ते दुसर्या व्यक्तीला दिसेल . वेब कैमरा हा एक विडियो शूटिंग कैमरा सारखा असतो . त्याने शूटिंग करून जे रिकॉर्डिंग केले आहे त्याचे आउट पुट आपणास मोनिटर च्या स्क्रीन वर बघायला मीळतो. वेब कैमरा त्याच्या मेगा पिक्सेल पाहून घेतला जातो जेवढे जास्त मेगा पिक्सेल तेवढा क्लेअर विडियो मीळतो. घरा मधील छोट्या मोठ्या कार्यक्रमाची शूटिंग आपण वेब कैमराने घेवू शकतो . वेब कैमरा USB पोअर्टला जोडला जातो .

 पेन ड्राइव :-


 CD मध्ये डाटा स्टोर करायला CD राईटर लागतो. ज्या ठिकाणी CD राईटर नाही त्या ठिकाणी डाटा कॉपी करण कठिण जात . फ्लोप्पी मध्ये खुप कमी डाटा स्टोर करता येतो म्हणुन फ्लोप्पी चा उपयोग जास्त मोठा डाटा कॉपी करण्यासाठी येत नाही . अशा वेळेस पेन ड्राइव हे अतिशय उपयुक्त साधन आहे .पेन ड्राइव मधे 256MB पासून ते सध्या 8GB पर्यंत साइज़ असणारे पेन ड्राइव उपलब्ध झाले आहेत . या मध्ये डाटा कॉपी करण ही अतिशय सोप आहे . ज्याप्रमाने आपण एखादी फाइल पीसी मध्ये कॉपी करून दुसरीकडे पेस्ट करतो त्याच प्रमाने पेन ड्राइव मध्ये आपण डाटा पेस्ट अथवा कॉपी करू शकतो .पेन ड्राइव USB पोर्ट ला जोडला जातो . पीसी ला जोडून आपणास पेन ड्राइव एक्सेस करायचा असल्यास माय कॉम्प्युटर आपण ओपन करून त्यात C: ड्राइव सारखा दुसर्या नावाचा पेन ड्राइवचा ड्राइव ओपन होतो . पेन ड्राइव मध्ये आता MP3 प्लेयर देखिल आले आहते ज्यामुळे आपण त्याचा २ प्रकारासाठी वापर करू शकतो . गाणी श्रवण करण्यासाठी आणि डाटा कॉपी करण्यासाठी . स्कैनर + स्पीकर :

 स्कैनर :-


 स्कैन केलेली माहिती आणि तीची प्रतिमा सिस्टिम युनिट मध्ये प्रक्रिया करू शकेल अशा भाषेत रूपांतरित करण्याच काम स्कैनर करते . स्कैनिंग उपकरणे ३ प्रकारची आहते ओप्टिकल स्कैनर , बार कोड स्कैनर आणि अक्षरे व चिन्हे ओळखणारी उपकरणे .

No comments:

Post a Comment